Thursday, 19 March 2015

हे असच असतं

माणसं ही माणसंच असतात फक्त सगळे सारखे नसतात
संगीतातले सुर तरी कुठे सारखे वाजतात
आणि पहायला गेलं तर हाताची बोटं तरी कुठे सारखे असतात
आपण उगीचच अपेक्षा करतो नेहमी सुखाची पण आयुष्यातही चढ उतार चालुच असतात

Monday, 16 March 2015

निर्दयी पाऊस

इतका कसा रे तू निर्दयी झाला तोंडाशि
आलेला घासच पळवून नेला

रक्ताच पाणी करून फूलवला होता मळा सारा
एका क्षणात सगळं भुइसपाट करून गेला

डोंगर उत्रवायचा होता कर्जाचा
तू तर कर्जाचा बोजा वाढवून गेला

जुळवत होतो हिशोब आयुष्याचा पण तुझ्या
आसमानी हैदोसाने सगळा खेळच् चौपट केला

उर बडवतोय मीच माझा, नशिबाने कसा घात केला.
पुढच्या जन्मी शेतकरी नको करू एवढा नवस मात्र देवाजवळ आवर्जून केला

हुंदके आवरले मी माझे डोळ्यात टीपुस नाही येऊ दिला
तू मात्र मनमुराद कोसळून गेला

इतका कसा रे तू निर्दयी झाला तोंडाशी
आलेला घासच पळवून नेला