Tuesday, 20 January 2015

आयुष्य

आयुष्य सुंदर आहे असं बऱ्याच वेळा वाटतं,
पण दुःखांच सावट आमच्याच आयुष्यात का दाटतं?

सुख साठवून ठेवता येत नाही आणि दुःख कायम
टिकून राहत नाही हे बऱ्याच वेळा मनाला पटतं

पण सुख जवाएवढे आणि दुःख पर्वताएवढे हे फक्त
आमच्यासाठी आहे की काय याचहि कधी कधी आश्चर्य वाटतं