Thursday, 9 January 2014

ग्राफिटी

"गणित विषय शिकवणारांनाही आयुष्याची गणितं कधी कधी नाही उमगत"  


"कधी कधी चुकीचे घेतलेले निर्णय नेहमीच चुकीचे नसतात"


"एकदा की माणुस व्यवहारात पडला की मग फार व्यवहारिक होतो"


"आपण जिच्या प्रेमात पडतो, ती व्यक्ती आपल्या प्रेमात नाही पडली तर आपण जाम आदळतो "


Wednesday, 8 January 2014

मी अनुभवलेला कोकण…


मी कोकणाच्या पावसात भिजलो, मी कोकणाचा पाऊस जवळुन अनुभवला, मी कोकणाच्या प्रेमात पडलो, खंर तर कोकणाने मला प्रेम करायला शिकवले, मला आयुष्य जगायला शिकवले, असा तो कोकण आणि तिथली माणसं…