देवा तुला मंदिरात एकट्याला भीती वाटत नाही का रे?
भीत जा रे माणसाला, माणूस खुप बदलला आहे
गुदमरुन जाशील रे कधी तरी गाभाऱ्यातुन तुला पळताही येणार नाही, सी.सी.टीव्ही. च्या जाळ्यात तुला कैद केला आहे
जाऊ तरी कसा देतील तुला तुझ्या जीवावरच त्यांचा धंदा चालू आहे
तुला माहित आहे की नाही मला माहित नाही पण तुझ्या दर्शनासाठी आता व्ही.आय. पी. रांगा लागतात
देणगी म्हणून आलेले पैसे मोजण्यासाठी जास्तीची माणसं बोलावी लागतात
देणगीतुन आलेल्या पैशातून मोठ मोठ्या पार्ट्या रंगतात, पार्ट्या करणारेच तुझ्या फोटोचे लॉकेट घालून फिरतात
देवा तुला मंदिरात एकट्याला भीती वाटत नाही का रे?
भीत जा रे माणसाला, माणूस खुप बदलला आहे