Tuesday, 9 December 2014

बळीराजा

माह्या बळीराजाचे हाल कसे कुणाला कळना
त्याच्या डोळ्यातले पाणी काही केल्यानं अटना

दुःखाचा डोंगर कसा कोसळतो त्याच्या उरावरती
उभ्या जगाचा पोशिंदा तरी बांधतो उभाडी

निसर्गालेबी त्याची दया येयीनासि झाली
पावसानं पाठ फिरवली अन् बी गिळून धरणीमाय गपच राहिली

बायलीने त्याच्या कधी आस दोन मण्यांची नाही केली
जुन्या बोळ्यावरती तिची सक्रतिमागुन् सक्रत गेली

डोळ्याची रोशनी गेली उपचारावाचून त्याच्या मायेची
लेकरांच्या शिक्षणाची होळी झाली पैक्यावाचून

पायतानं झिजली त्याची सावकारांची उंबरठे घासुन
वैतागला हो माझा बळीराजा त्यानं घेतलं उपाशिपोटीच् लटकुन

कसा अजब न्याय हो या देवानी केला
जगाचा पोशिंदा उपाशिपोटीच हो मेला